– २५ कच्च्या घरांची पडझड
– ४१३.०० हे.आर शेती पिकांचे नुकसान
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जून महिना कोरडा गेल्याने यावर्षी ‘गरजे इतका तरी पाऊस येऊ दे रे देवा’ अशी आर्त हाक बळीराजा देत असतानाच जुलै महिन्यात पावसाने अख्या तालुक्याला झोडपून काढले.परिणामी २२ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे तालुक्यात २५ कच्च्या घरांची पडझड होत ४१३.०० हे.आर शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
गत काही दिवसापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.परिणामी नदी नाले दुथडी भरून वाहत आहे.

दरम्यान २२ जुलै रोजीच्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील २५ कच्च्या घरांची पडझड झाली असून यात तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या कोसारा येथील दौलत मेश्राम यांचे घर जमीनदोस्त झाले आहे.तर चिंचमंडळ येथील काही कच्च्या घरांची पडझड झाली आहे.अतीवृष्टीमुळे ४१३.०० हे.आर वरील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

सद्यस्थितीत अतिवृष्टीमुळे मारेगाव तालुक्यात कुठेही जीवित हानी झाली नसली तरी शेती पिकांचे मोठे नुकसान होत पिके खरबडुन गेल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.





