– आणखी काही आरोपींची नावे उघड होण्याची शक्यता
– मारेगाव पोलीसांची कारवाई
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात तार-लोखंड चोरट्यांची टोळी सक्रिय असून भालेवाडी येथील रोपवन क्षेत्रातील पोल चोरीची तक्रार २० जुलै रोजी पो.स्टे.ला दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवत अवघ्या काही तासांत चोरी झालेल्या ५० लोखंडी पोल सह दोन संशयितांना ताब्यात घेतले.सदरची कारवाई मारेगाव पोलीस पथकाने केली असुन या प्रकरणी आणखी काही आरोपींची नावे उघड होण्याची शक्यता आहे.
तालुक्यातील भालेवाडी रोपवन क्षेत्रातील रोपांसाठी ता.१० जुलै रोजी ९०० लोखंडी पोलचे तारकंपाऊंड करण्यासाठी मजुरांकडुन लोखंडी खांब उभे करण्यात आले.
ता.१९ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेदरम्यान फिर्यादी रोहीत लक्ष्मणराव बोलेनवार (३४) रा. सुयोग नगर पांढरकवडा हे मजुरासह भालेवाडी परिसरात पाहणी साठी गेले असता भालेवाडी रोपवन क्षेत्रात उभे केलेले लोखंडी एम. एस. अँगल पोल ५०, (किंमत अंदाजे ३० हजार रु.) अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे लक्षात येताच ता. २० जुलै रोजी मारेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदविण्यात आली.
मारेगाव पोलीसांनी फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरुन कलम ३७९, ३४ भांदवी अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत २० जुलै रोजी संशयित आरोपी हुसेन आडे (२३) रा.बोदाड व शाम गाथाडे (२९) रा.सालेभट्टी यांना ग्राम पाथरी शिवारातुन ताब्यात घेतले.त्यांचेकडुन ५० लोखंडी पोल असा ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे उघड होण्याची शक्यता आहे.
सदर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक पवन बन्सोड,अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश कींद्रे,पो.नी.आधारसिंग सोनवने यांचे मार्गदर्शनात मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव,पोहेका आनंद अलचेवार, नापोका अफजल पठान, नापोका अजय वाभीटकर, नापोका रजनीकांत पाटील,चासफौ प्रमोद जिड्डेवार,पोका विकास खंडारे,चापोका अतुल सरोदे करीत आहे.
