– विजय वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्तीपत्र
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक आकाश बदकी यांची मारेगाव तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.येथील आयोजित एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून ही नियुक्ती करण्यात आली.
मागील काही काळात तालुक्यात काँग्रेसने अनेक चढ-उतार अनुभवले.तालुक्यातील काँग्रेसचा अस्थिर आलेख पाहता युवकांना पक्षाशी जोडणारे एकनिष्ठ नेतृत्व गरजेचे होते.
परिणामी गेल्या कित्येक वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले मारेगावातील प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक आकाश युवराज बदकी यांची मारेगाव तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.यावेळी युवक काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
युवकांना एकत्र घेऊन पक्ष संघटन करून पक्ष वाढीस प्रयत्न करणे ही प्रमुख जबाबदारी नगरसेवक आकाश बदकी यांची राहणार असुन त्या अनुषंगाने त्यांची कसोटी लागणार आहे.




