– १ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
– दोन संशयित व्यक्ती ताब्यात
– मारेगाव पोलीस पथकाची कारवाई
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पोलीस पथक ता .३ जुलै रोजी ४:४५ वाजेदरम्यान झरी येथे जात असता तालुक्यातील सुरला-पेंढरी रस्त्यावर दोन व्यक्ती काही जनावरांसह पायदळ जात असल्याचे निदर्शनास आले.सदर व्यक्तींना याबाबत विचारणा केली असता जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी कबुल केले.परिणामी ७ जनावरे, दोन संशयितांसह १ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.ही कारवाई मारेगाव पोलीस पथकाने केली.

ता.३ जुलै रोजी मारेगाव पोलीस पथक कोर्ट कामानिमित्त झरी येथे जात असता सायंकाळी ४:४५ वाजेदरम्यान तालुक्यातील सुरला-पेंढरी रस्त्यावर २ व्यक्ती ७ जनावरांसह पायदळ जात असल्याचे निदर्शनास आले.सदर व्यक्तींना याबाबत विचारणा केली असता त्यांनी अतिशय निर्दयतेणे,पायी जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे कबूल केले.
उमेश जनार्दन चापले (३०) रा.मारेगाव व वसंता रामा आत्राम (५७) रा.भालेवाडी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यावेळी संशयतांना पोलिसी खाक्या दाखवताच कत्तलीसाठी घेऊन जात असलेली ७ जनावरे ही तस्लिम खा.वहाब खा.कुरेशी रा.मारेगाव यांचे मालकीचे असल्याची कबुली त्यांनी दिली.

मारेगाव पोलीस पथकाने दोन्ही संशयितांना ताब्यात घेत त्यांचेकडून ७ जनावरे असा एकूण १ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.तर तस्लिम खा.वहाब खा.कुरेशी यांचेसह उमेश चापले व वसंता आत्राम अशा तीनही संशयित आरोपींवर प्राण्यांना कृरतेने वागविण्यासंबंधीच्या प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमा नुसार गुन्हा दाखल केला.सुटका केलेल्या सातही जनावरांची रवानगी श्री.गुरु गणेश गौशाळा,रासा ता.वणी येथे करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्दन खंडेराव यांचे मार्गदर्शनात स.फौ.रमेश ताजने,चासफौ.प्रमोद जिड्डेवार नापोका रजनीकांत पाटील यांनी पार पाडली.
