– मारेगाव तालुक्यातील सुरला येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील सुरला येथील एका ३२ वर्षीय विवाहितेने विषाचा घोट घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची दुखद घटना १ जुलै रोजीचे मध्यरात्री घडली.या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिभा संतोष दुधगवळी (३२) रा.सुरला असे विषाचा घोट घेत आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.त्या शेतमजूर होत्या.
दरम्यान २ जुलै रोजी पहाटे ५ वाजता मृत प्रतिभा यांचे पती संतोष दुधगवळी झोपेतून उठले असता त्यांना प्रतिभा या मृत अवस्थेत आढळून आल्या.घरातील दुसऱ्या खोलीत ठेवलेल्या ग्लास मधुन विषारी औषधाचा वास येत असल्याने प्रतिभा यांनी विषारी औषध प्राशन केले ही बाब कुटुंबियांचे लक्षात आली.
प्रतिभा यांनी आत्महत्या का केली…? हे अद्याप कळू शकले नाही.मृत प्रतिभा यांचे पश्चात पती संतोष दुधगवळी,मुलगा प्रतीतोष व शौर्य असा आप्त परिवार आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
