– मारेगाव तालुक्यातील घटना
– खलबत्त्याने ठेचुन कोयत्याने वार…काका जागीच ठार
– संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
झिंगलेल्या पुतण्याने काकास आधी खलबत्त्याने ठेचुन नंतर कोयत्याने सपासप वार केल्याने काकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची खळबळजणक घटना तालुक्यातील कोसारा येथे ३० जून रोजी सकाळी ०९ : ३० वाजे दरम्यान घडली.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.
सुभाष संभाजी पचारे (५०) रा.कोसारा असे घटनास्थळीच ठार झालेल्या काकाचे नाव असुन मोहन (चंपत) देविदास पचारे (३२) रा.कोसारा असे त्यांचे पुतण्याचे नाव आहे.
दरम्यान ता.३० जुनचे सकाळी ९:३० वाजेदरम्यान काका व पुतण्या दोघांनीही मृत सुभाष यांचे घरी सोबत बसुन दारू ढोसली. दारूची नशा डोक्यात गेल्याने काही कारणास्तव दोघांमध्ये वाद उद्भवला.शाब्दिक वादाने उग्ररूप धारण केल्याने पुतण्याने काकास आधी खलबत्त्याने ठेचुन निपचित काकावर कोयत्याने सपासप वार करून घटनास्थळीच ठार केले.
एन आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून निर्दयी पुतण्याच्या अशा कर्तुत्वाने समाजमन सुन्न झाले आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तसेच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
