– मधुकरराव वाघाडे यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये वास्तव्यास असलेले,हमाल काम करून आपला उदरनिर्वाह करणारे व दरवर्षी रावण दहनावेळी हनुमानाचे पात्र साकारणारे मधुकर वाघाडे यांचे २९ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजे दरम्यान दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ५५ वर्ष होते.
मधुकर वाघाडे हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने ग्रस्त होते.त्यासाठी त्यांचेवर नियमित उपचार सुरू होता.
दरम्यान २९ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान मारेगाव येथील राहते घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे अशा अवेळी एक्झिटने वाघाडे कुटुंबियांवर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रावण दहना वेळी साकारायचे हनुमानाचे पात्र…!
मधुकर वाघाडे हे मनमिळाऊ स्वभावाचे होते.कुणाच्याही एका हाके वर मदतीस धावून जाणारे मधुकरराव मारेगावात रावण दहन सुरू झाले त्यावेळीपासून हनुमानाचे पात्र साकारत होते. हमालीचे काम करत असले तरी गोड स्वभावामुळे ते अनेकांचे आवडते होते.परिणामी त्यांच्या अशा अवेळी एक्झिटने मारेगाव शहरावर पुरती शोककळा पसरली आहे.
मृत मधुकरराव यांचे पश्चात एक विवाहित मुलगी,एक मुलगा असल्याची माहिती आहे.
