– अ.भा.स.प.चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच नियमित काही काम करिता पंचायत समिती मारेगाव येथे येत असतात.त्यांचे करिता पं.स.मध्ये वेगळी बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी या बाबतचे निवेदन अ. भा.स.प.मारेगाव यांनी गटविकास अधिकारी पं.स.मारेगाव यांना १३ जून रोजी दिले.
तालुक्यातील विभिन्न गावातील सरपंच उपसरपंच दररोज काही ना काही कामानिमित्त पंचायत समिती मारेगाव येथे येत असतात.परंतु प.स.येथे गावाच्या कारभाऱ्या करिता वेगळी अशी बैठक व्यवस्था नाही.त्यामुळे त्यांना बाहेर उभे राहावे लागते.
दरम्यान सरपंच-उपसरपंच यांचेकरिता प.स.येथे स्वतंत्र बैठक व्यवस्था (रूम) उपलब्ध करून देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषद,मारेगावने गटविकास अधिकारी पंचायत समिती, मारेगाव यांना १३ जून रोजी दिले. सोबतच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट,तुळशीराम कुमरे, गोवर्धन तोडासे, दयानंद कुडमेथे, रामचंद्र जवादे, गौतम दारुंडे उपस्थित होते.





