– तालुक्यातील वरुड येथील शेतकऱ्याची व्यथा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वरुड येथील शेतकरी शेतात तारेचे कुंपण करीत असता शेजारील शेतकऱ्याने तारेच्या कुंपण होऊ देण्यास मज्जाव केला.ही बाब पीडित शेतकऱ्याने वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.प्रशासनाने ही बाब गांभीर्याने न घेतल्याने अखेर आठ मे रोजी पीडित शेतकऱ्याने येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचे हत्यार उपसले.
तालुक्यातील वरुड येथील शेतकरी पांडुरंग बिजाराम भट यांचे मालकीचे शेत गट क्रं.१०४/३ मध्ये असून ते आपल्या शेतात तारेचे कुंपण करू इच्छित होते. परंतु गेल्या सहा महिन्यापासून शेजारील शेतकऱ्याने त्यांना तारेचे कुंपण करण्यास पुरता मज्जाव केल्याने त्यांनी अनेकदा ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
प्रशासनाने सदर बाब गांभीर्याने घेतली नसल्याने अखेर पांडुरंग भट यांनी आठ मे रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाची हत्यार उपसत प्रशासनाचे लक्ष वेधले.
