– जप्तीची केली कार्यवाही, कार्यवाही नंतर एक ट्रॅक्टर पसार
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मोरेश्वर ठाकरे
निवासी नायब तहसीलदार व कर्मचारी सावंगी कोसारा शिव रस्त्यावर ता. २६ एप्रिल रोजी पेट्रोलिंग करत असताना अवैध रेती तस्करी करताना सकाळी सकाळी ११ वाजे दरम्यान दोन ट्रॅक्टर पकडले असुन जप्तीची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यातील एक ट्रॅक्टर मात्र पसार झाला. सदर ट्रॅक्टर वर कार्यवाही साठी मारेगाव पोलीसाना पत्र देऊन कळविण्यात आले आहे.
निवासी नायब तहसिलदार व एक कर्मचारी सावंगी कोसारा शिव रस्त्यावर पेट्रोलिंग वर असताना दोन ट्रॅक्टर आढळून आले. ट्रॅक्टर थांबवुन पाहणी केली असता दोन्ही ट्रॅक्टर मध्ये सव्वा सव्वा ब्राॅस रेती आढळून आल्याने दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेत कार्यवाही करण्यात आली.
मात्र कार्यवाही झाल्यानंतर तथा निवासी नायब तहसिलदार व एक कर्मचारी असल्याचे पाहुन त्यातील एक ट्रॅक्टर पसार झाला. एक ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात असुन पसार झालेल्या ट्रॅक्टर ताब्यात घेण्यासाठी मारेगाव पोलीसांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
सदर कारवाई निवासी नायब तहसीलदार कीशोर यादव व कर्मचारी वेले यांनी केली आहे.
