– मारेगाव येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती शहरात ठिकठिकाणी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली.
दरम्यान मारेगाव येथे १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय तथा पुर्व केद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज भैय्या अहीर यांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन केले.
यावेळी मारेगांव तालुका भा.ज.पा.चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.




