– विदर्भ राज्यस्तरीय कबड्डी सामने
– जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब वेगाव यांचे आयोजन
• लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
स्व.कु.अविनाश जीवन मेश्राम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब वेगाव द्वारा आयोजित ‘विदर्भ राज्यस्तरीय कबड्डीच्या’ खुल्या सामन्यांचा थरार आजपासून सलग तीन दिवस वेगाव येथील खुल्या पटांगणावर रंगणार आहे.
स्व.कु.अविनाश जीवन मेश्राम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जय जगन्नाथ स्पोर्टिंग क्लब वेगाव द्वारा आयोजित ‘विदर्भ राज्यस्तरीय कबड्डीच्या’ खुल्या सामन्यांच्या आयोजन वेगाव येथील खुल्या पटांगणावर आजपासून करण्यात आले असुन या तीन दिवसीय कबड्डीच्या सामन्यांचे उद्घाटन आज सायंकाळी सात वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते पार पडणार असून उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर भूषविणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी माजी जि.प.सदस्य अनिल पा.देरकर, वेगाव येथील सरपंच उषा देरकर,उपसरपंच दीपक कळसकर,सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट,मारेगाव येथील प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक वैभव पवार,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कोडापे यांचेसह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असून स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





