♦मांगरुळ येथील घटना
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
मांगरुळ येथील एका ३२ वर्षीय युवकाने गावाशेजारी असलेल्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार ता.१९ मार्च रोजी सकाळी ५ वाजेदरम्यान उघडकीस आली.
प्रफुल्ल मोरेश्वर खडसे (३२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असुन ते मांगरुळ येथे वास्तव्यास होते.ते तीन भाऊ असुन सामाईक क्षेत्रात १४ एकर शेती असल्याची माहीती आहे.त्याचे मागील वर्षीच लग्न झाले होते.
सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आलेल्या नैराश्यातून त्यांनी टोकाची भुमिका घेतल्याची माहिती असुन ता. १९ मार्च रोजी सचिन वटे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन प्रफुल्ल यांनी आत्महत्या केल्याची घटना सकाळी पाच वाजेदरम्यान उघडकीस आली. प्रफुल्ल यांच्या मागे आई, पत्नी,दोन भाऊ असा परिवार आहे.