मध्यरात्री कारवाई : एक ट्रॅक्टर जप्त
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यात अवैध रेती तस्करी जोमात सुरू असतानाच मारेगाव महसूल विभागानेही आपली कंबर कसली असून मध्यरात्री चिंचमंडळ येथील नाल्यातून रेती तस्करी करणाऱ्या एका ट्रॅक्टर वरती जप्तीची कारवाई करून अवैध रेती तस्करीवर आपला फास अधिक घट्ट आवळला.महसुल पथकाने चार दिवसात केलेल्या दुसऱ्या कारवाईने रेती तस्करांचे पुरते धाबे दनाणले आहे.
तालुक्यात मुबलक रेती घाट असून गौणखनिज उत्खननही जोमात सुरू आहे.परिणामी रेती तस्करीने चांगलाच जोर धरला आहे.अगदी बिनदिक्कत दिवसाढवळ्या राजरोसपणे रेतीची अवैध चोरटी वाहतूक शहरासह तालुक्यात जोमात सुरू आहे.
दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवत ता.१९ जुनचे रात्री १२:०५ मी.तालुक्यातील चिंचमंडळ येथील उत्तरेकडील नाल्यातून अवैध रेतीची चोरटी वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर (क्र.एम.एच.२९ बी.पी.४०३८), अर्धा ब्रास रेती सह ट्रॅक्टर चालक नहामद पठान (३६) रा.चिंचमंडळ यास मारेगाव महसूल विभागाने रंगेहात पकडत अवैध रेती तस्करीवर आपला फास अधिक घट्ट आवळला.
शासकीय इमारती समोरच अवैध रेती साठा…!
संबंधित बातमी वाचण्याकरिता खालील लिंक वरती क्लिक करा.
https://lokshashtr.in/illegal-sand-pile-in-front-of-government-building/
संतोष गोपाळा चिने रा.चिंचमंडळ असे जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकाचे नावे असून ट्रॅक्टर मारेगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे.
सदर जप्तीची कारवाई मारेगाव येथे काही दिवसापूर्वीच रुजू झालेले तहसीलदार यु.एस.निलावाड यांचे मार्गदर्शनात नायब तहसीलदार ए.टी.भगत, मंडळ अधिकारी अमोल घुगाने यांनी केली.




