– मारेगाव शहरातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरातील एका पंचवीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेत स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना १५ जुन रोजी दुपारी १२:३० वाजेदरम्यान घडली.
शंकर कवडू गजभे (२५) रा.मारेगाव (प्रभाग क्र.१२) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्यांचा मारेगाव येथील धामणी रोड स्थित पानटपरीचा व्यवसाय होता.शंकर हे अविवाहित होते.
दरम्यान १५ जून रोजी दुपारी १२:३० वाजेदरम्यान शंकर यांनी स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. वृत्तलिहेपर्यंत त्यांचे मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नव्हते.
मनमिळाऊ व सुस्वभावी शंकर यांचे अशा अवेळी जग सोडून जाण्याने गजभे कुटुंबावर पुरता दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृत शंकर यांचे पश्चात आई,वडील,मोठे भाऊ,वहिनी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
