– अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
वनोजा देवी परिसरात गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्रीने कळस गाठला असुन तरुण पिढी दारूचा घोट घेत नशेच्या आहारी जात आहे.दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक कलह निर्माण होऊन परिसरातील अनेक कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असून अवैध दारू विक्रीला तात्काळ लगाम लागण्यासंबंधीचे निवेदन २४ मार्च रोजी वनोजा येथील महिलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिले.
तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत हद्दीत राजरोसपणे अवैध देशी दारू विक्री सुरू असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.तरुन व्यसनाधीन झाल्याने कौटुंबिक कलह वाढत असुन मद्यपींचे दारू पिऊन महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले असल्याने वनोजा येथील अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी या संबंधि ग्रामपंचायत ठराव घेत वनोजा येथील शेकडो महीला तत्संबंधी चे निवेदन घेऊन २४ मार्च रोजी मारेगाव पोलीस स्टेशनवर धडकल्या.
यावेळी वनोजा येथील सरपंच डीमन टोंगे, उपसरपंच प्रशांत भंडारी वनिता ढोके,सुषमा ढोके,अमृता ढोके,सिंधू सोनटक्के,चंद्रकला राजूरकर,सीमा शिंदे, प्रियांका बोढे,इंदिरा बरडे,विमल सातपुते, जोत्स्ना आस्वले,गिरजा राजूरकर,कुंता मोतेकर,परवीन शेख,मनीषा राजूरकर, सुनंदा राजूरकर,प्रशांत बोढे,गोवर्धन टोंगे यांचेसह शेकडो महिला उपस्थित होत्या.
