– मारेगाव तालुक्यातील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील खैरगाव येथे क्षुल्लक कारणावरून दोन महिलांत बाचाबाची झाल्याने शाब्दिक वाद वाढत जाऊन वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडली.सदर घटनेची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.
रस्त्यावर बैलगाडी ठेवून रस्ता का अडविला…? अशी विचारना गंगुबाई गोविंदा आत्राम (५५) रा.खैरगावं यांनी आरोपी प्रेमिला रामपूरे यांना केली असता अश्लील शिवीगाळ करीत मुलगा अक्षय रामपूरे याचेसह गंगुबाई आत्राम यांस काठीने जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.यात गंगुबाई आत्राम यांचे कमरेला व पायाला जबर दुखापत झाली.
सदर घटनेची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी विरुध्द भादवी ३२४,२९४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.
