– अवकाळीचा कहर अन् स्वप्नाची राखरांगोळी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
शहरासह परिसरात गेल्या महिना भरापासून अवकाळीने धुमाकूळ घातला आहे.ता.२७ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान वादळे वाऱ्याने तालुक्यातील घोगुलदरा येथील चंद्रभान रामा कोंडेकार (५०) यांचे घर पडल्याने त्यांचे स्वप्नांची पूरती राख रांगोळी झाली.
चंद्रभान रामा कोंडेकार यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला.स्वत: जवळील काही शिल्लक लावून पक्के घर झाल्याने आयुष्यभर त्याच घराच्या छतात राहून उन – वाऱ्यापासून बचाव होईल असे स्वप्न उराशी बाळगत असताना ता.२७ एप्रिल रोजी अवकाळीने त्यांचे स्वप्न धुळीस मिळविले.
ता.२७ एप्रिल रोजीच्या वादळी वाऱ्यात त्यांचे उभे घर कोसळल्याने स्वप्नांची पुरती राख रांगोळी झाली. कुटुंबातील सदस्यांसह वेळीच शेजारील घरात आसरा घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
सुभद्रा जयपाल आत्राम (३८) यांचे घरावरील टिनावरती दगड ठेवले असता ता. २७ एप्रिल रोजीच्या वादळी वाऱ्याने दगडांची हालचाल होत त्यांचे घरावरील टिना चीरल्या गेल्या.
चंद्रभान व सुभद्रा यांची परिस्थिती हलाखीची असल्याने शासन मदतीकडे त्यांचे डोळे लागले आहे.





