— तहसीलदार निलावाड यांचे नागरिकांना आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क मारेगाव……
पाच दिवसांपासून तालूक्यात धो धो पाऊस कोसळत असुन या संततधार पावसामुळे ता. ९ जुलै रोजी दुपारी १२.३० वाजेदरम्यान वर्धा नदीवरील कोसारा सोईट येथील पुलावरुन दोन फुट पाणी वाहत आहे.परिणामी खैरी ते वरोरा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वर्धा नदीपात्रालगतच्या नागरीकांना संतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार मारेगाव उत्तम निलावाड यांनी केले आहे.
कोसारा येथील पोलिस पाटील तथा महसूल सेवक यावेळी परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.





