– ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
– गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार
लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
वंदनिय राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतुन गाव खेडे कसे असावे, मानवी राहणीमान, राजकारण, समाजकारण, तथा विज्ञानाची सांगड घालत ग्रामगीतेचा संपुर्ण ग्रंथ सकल समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचावा यासाठी ग्रामगीतेची रचना करुन लोक कल्यांनासाठी दिली.
तोच धागा पकडून ग्रामगीतेच्या ६७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन ता २५ डिसेंबर २०२२ पासुन तालुका गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रिय सभासद रुपेश ढोके यांच्या संकल्पनेतुन तथा सेवकांच्या सहकार्याने “गांव तिथे ग्रामगीता” अभियान राबविण्यात येत असुन आज अंतिम टप्प्यात आहे. या अभियानास तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
समाजातील प्रत्येक घटकास ग्राम गीते बाबत माहीती असावी तथा वंदनिय महाराजानी लोक कल्याणासाठी दिलेली ग्रामगीता घराघरात पोहचविण्याचे कार्य गुरुदेव सेवा मंडळ करीत असुन या अभियानाची सुरुवात ता.२५ डिसेंबर २०२२ रोजी मारेगाव येथील जगन्नाथ बाबा मंदिरातुन,पोलिस निरीक्षक राजेश पुरी यांनी झेंडी दाखवून करण्यात आली होती.
दर रविवारी हे अभियान राबविण्यात आले व येत आहे.तालूक्यात एकून १०६ गावे असुन ८२ गावामधे जनजागृती करून प्रत्येक गावामधे ग्रामगीता भेट दिली आहे. आता फक्त २० वर गावामध्ये ग्रामगीता अभियान होणार असून अंतिम टप्प्यात आहे.यासाठी तालूक्यातील गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व सेवक अथक परिश्रम घेऊन अभियान यशस्वी करत आहेत.
| आठवण…….. वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवि पुण्यतिथी सोहळ्याचे औचित्य साधुन तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या पुढाकाराने तालुक्यातील शंभराहुन अधिक असलेल्या गाव खेड्यात ता.११ नोव्हेंबर २०१८ ते १७ फेब्रुवारी २०१९ पर्यंत “एक पाऊल खेड्याकडे “हा कार्यक्रम यशस्विरित्या राबविण्यात आला.यामध्ये सामुदायीक ध्यान व प्रार्थनेचे महत्व,ग्राम जागृती,ग्राम स्वच्छता,हागणदरीमुक्त गांव, शेतकरी आत्मसम्मान व ग्रामसभा, बेटी बचाव बेटी पढाव, महिलोन्नती, व्यसन मुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलण, शैक्षणिक विकास, युवा जागृती या विषयांवर प्रबोधन करण्यात आले होते. |





