– आदिवासी समाज बांधवांचे ठाणेदारांना निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गेल्या अनेक वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी राजा रावण यांचा पुतळा दहन करण्याची प्रथा सुरू आहे.आदिवासी समाज बांधवांस महात्मा राजा रावण यांचे बद्दल आस्था असून ते आमचे दैवत आहे.परिणामी विजयादशमीच्या दिवशी रावण दहन करू नये व असे करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन समस्त आदिवासी बांधवांनी मारेगाव ठाणेदार यांना दिले.
दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी महात्मा राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते.शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे.
दरम्यान या विरोधात आदिवासी समाज बांधव आक्रमक झाले असून “महात्मा राजा रावण हे आमची आस्था असून ते आमचे दैवत आहे.काही धार्मिक संस्थांकडून हेतू पुरस्सर विजयादशमीच्या दिवशी राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन केले जाते.यामुळे आदिवासी व अनुसूचित जाती जमातीच्या समाज बांधवांच्या सन्मानाला जाणून-बुजून ठेच पोहोचविली जात आहे.परिणामी राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन बंद करावे” अशा आशयाचे निवेदन समस्त आदिवासी समाज बांधवांनी मारेगाव ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातुन देण्यात आला आहे.
सोबतच राजा रावण यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांवर कायदेशीर करण्यात कार्यवाही करण्यात यावी अन्यथा समस्त आदिवासी समाज बांधवांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी नगरसेवक अनिल गेडाम, स्वीकृत नगरसेवक शंकर मडावी, नगरसेविका सौ.सुशीला भादेकर, सौ. अनिता नत्थू परचाके, नगरसेविका सौ. छाया प्रदीप किनाके यांचेसह तुळशीदास पेंदोर,वीजु मेश्राम ,शेषराज मडावी,सचिन मेश्राम, मारुती परचाके,मयूर मसराम सह असंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते .




