— पाणी पुरवठा नियमित सुरु करा
— अन्यथा आंदोलनाचा गर्भित इशारा
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मागील अनेक दिवसापासुन वणी शहरात एक एक आठवडा पाणीपुरवठा होत नसल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसत असल्याने एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करुन दिलासा द्यावा. अन्यथा नगर परिषदेसमोर आंदोलन करण्याचा गर्भित इशारा म. रा. सह. कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्वात, मुख्याधिकारी वणी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
मे महिन्यात सुर्य आग ओकत असुन उष्मांक ४१, ४२ आहे. सोबतच वातावरण बदलाचा सुध्दा तालुक्यातील जनता अनुभव घेत आहे. उन्हाळा असल्याने घरगुती, तथा पीण्याचे पाणी सर्वसामान्य जनतेला आवश्यक असताना, मागील अनेक दिवसापासुन वणीकरांना एक एक हप्ता पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे वणीकर या पाणी टंचाईला पुरते वैतागले आहे. “जल हे जीवन ” याप्रमाणे प्रत्येक मानसाला पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेस पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे विदारक वास्तव असुन यामुळे मात्र सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री बसत आहे.
याबाबत प्रशासनास अनेकदा मौखिक विनंती करण्यात आली, मात्र आत्तापर्यंत प्रशासनाकडून पाणी टंचाईचे निवारण करण्यात आले नसल्याचा ठपका ठेवत, जर एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही तर नगर परिषदेसमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचा गर्भित इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी राजाभाऊ पाथ्रडकर, साधना गोहोकर, शारदा ठाकरे, अशोक चिकटे, प्रेमनाथ नैताम, पीएस उपरे, प्रमोद लोणारे, पलाश बोढे, क्रिष्णा पचारे, सुरेश बनसोड, लता भोंडाळे, मिनाक्षी रासेकर, पद्मा ताजणे, सारिका बोबडे, संगिता खाडे, विजयालक्ष्मी आगबत्तलवार, ललिता बरशेट्टीवार, मंगला झिलपे, सविता रासेकर, अशोक पांडे, कैलास पचारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

——————————————————————–
आंदोलन करणार…!
सध्या वणीकर पाणीटंचाई चा सामना करत असुन एक एक आठवड्यानंतर पाणी सोडले जात आहे. ते सुध्दा रात्र जागून काढल्यानंतर मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे एका आठवड्यात पाणीसमस्या सोडवा अन्यथा वणीकर जनतेला सोबत घेऊन नगर परिषदेसमोर आंदोलन करणार.
संजय खाडे,
संचालक,
म. राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित, मुंबई
विभागीय कार्यालय, वणी
अध्यक्ष: जय जगन्नाथ अर्बन निधी लि. वणी
संचालक : दि वसंत सह. जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी, वणी
मागील काही दिवसापासून वातावरण बदलामुळे वीज, वादळ, पाऊस यामुळे सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. म्हणुन पाणीपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. मात्र येत्या दोन तीन दिवसात पाणीपुरवठा निश्चित सुरळीत होईल.
सचिन गाडे
मुख्याधिकारी,
नगर परिषद वणी





