– वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
एकीकडे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असतानाच शहरात १८ एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात अवकाळी पावसाने पुनश्च एकदा हजेरी लावली.
गेल्या काही दिवसा पासून वातावरणात कमालीचा बदल होऊन उन-पावसाची उघडझाप सुरू आहे.एकीकडे तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे मात्र अवकाळीच्या सरी कोसळत असल्याने दुहेरी संकट ओढवले असल्यागत भास होतो आहे.
मंगळवारी सायंकाळी ८ वाजे दरम्यान शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाने जोरदार हजेरी लावली.तब्बल एक ते दीड तास पावसाची रिमझिम सुरू होती.
आठवडी बाजाराचा दिवस असल्याने अनपेक्षितपणे कोसळलेल्या पावसाने जनसामान्याची चांगलीच तारांबळ उडून शहरात काही वेळ विजेचा लपंडाव सुरू होता. पुढील काही दिवस पावसाची संभाव्य शक्यता असल्याचा अंदाज असून नागरिकांनी विशेषतः शेतकरी बांधवांनी सजग राहुन शेतीच्या कामांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.




