– महसूल व पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वरती मारेगांव महसुल विभाग व पोलीस प्रशासनाने १६ जुन रोजी सकाळी ७ वाजता दांडगाव येथे संयुक्त कारवाई करून अवैध रेती तस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पुनश्च एकदा दाखवून दिले आहे.सदर कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
तालुक्यात मुबलक रेती घाट असून गौणखनिज उत्खननही जोमात सुरू आहे. यात रेती तस्करीने मात्र चांगला जोर धरला आहे. अगदी बिनदिक्कत दिवसाढवळ्या राजरोसपणे रेतीची अवैध चोरटी वाहतूक शहरासह तालुक्यात सुरू आहे.
दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवत १६ जुन रोजीचे सकाळी ७ वाजता तालुक्यातील दांडगाव येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर मारेगाव महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने रंगेहात पकडले.पहाटे ४:३० वाजेपासून पथक दांडगाव येथे दबा धरून बसले होते हे विशेष.
विशाल अभिमान लांबट रा.दांडगाव व विनोद पंढरी ढेंगळे रा.दांडगाव अशी जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांची नावे असून दोन्ही ट्रॅक्टर मारेगाव येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
सदर जप्तीची कारवाई मारेगाव येथील तहसीलदार यु.एस.निलावाड,मंडळ अधिकारी अमोल घुगाने, एएसआय प्रमोद जिड्डेवार,नापोका अजय वाभीटकर,चालक विजू कनाके यांनी केली.
