– महसूल प्रशासनाची कारवाई
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील मार्डी मजरा मार्गावर ता.२९ मार्चला सकाळी मारेगाव महसूल विभागाचे विशेष पथक गस्तीवर असतांना अवैध रेती वाहतूक करणारा एक ट्रक ताब्यात घेऊन कार्यवाही करण्यात आली.
रेती तस्करी करणारे विविध युक्त्या वापरून रेतीची चोरी करण्याचा प्रयत्न करतात. तर महसूल प्रशासन यावर बारीक नजर ठेवून असल्याने नियमित कार्यवाही होत आहे. परिणामी रेती तस्करी करणाऱ्यात धास्ती निर्माण झाली असतानाच काही मुजोर तस्कर प्रशासन कामात असल्याचा फायदा घेत तस्करी करीत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.
तहसीलदार उत्तम निलावाड यांनी रेती तस्करीला आळा बसावा यासाठी महसूल विभागाचे विशेष पथक तैनात केले आहे. दरम्यान ता. २९ रोजी सकाळी तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी अमोल गुघाने, तलाठी कुळमेथे, मडावी, सोयाम, कोतवाल भोंगळे, कोयचाडे, येवले हे पथक मार्डी मजरा मार्गावर कर्तव्यावर असताना रेती भरलेला ट्रक येताना दिसताच एम एच २७ बी एक्स ४५५९ क्रमांकाच्या ट्रकला थांबविण्यात आले. रेती भरुन असल्याने पथकाकडुन वाहन चालकास राॅयल्टी व इतर कागदपत्राबाबत विचारणा करण्यात आली. परंतु चालक काहीही बोलला नसल्याने रेतीसह ट्रक ताब्यात घेऊन जप्ती ची कारवाई करण्यात आली.
वाहन मालकाकडे राॅयल्टी ता. २८ मार्च ची असल्याने विचारणा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार ट्रक हा २८ तारखेची राॅयल्टी असल्याने २८ लाच निघाला परंतु ट्रक रस्त्यातच नादुरूस्त झाल्याने वेळ लागला असल्याचे वाहनचालक मालकाकडुन सांगण्यात आले आहे. त्यानुसार महसूल प्रशासन चौकशी करणार असुन सध्यातरी ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.
उत्तम निलावाड,
तहसीलदार मारेगाव.
