– मारेगाव तालुक्यातील घटना
– परिसरात सर्वत्र हळहळ
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील एका युवकाने विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची घटना ६ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजेदरम्यान घडली.अवघे १८ वर्ष वय असताना युवकाने आपली जीवन यात्रा संपविल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
निकेश तुळशीराम आत्राम (१८) रा.पेंढरी असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. निकेश हा गावातच बकऱ्यांची राखण करायचा.
घरची परिस्थिती बेताची असल्याने अवघ्या पाच एकर शेतीत निकेशचे वडील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.तर निकेश हा गावातच बकऱ्यांची राखण करायचा तर कधी गवंडी काम हाती लागल्यास ते काम निकेश करायचा.६ जून रोजी सायंकाळी तो शेतात गेला असता घरी परत आलाच नाही. वडिलांनी सर्वत्र विचारपूस केली असता त्याचा थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान शेत शिवार पालथे घालत असता पेंढरी शिवारातील बोरगाव येथील सोयाम यांचे शेतात निकेश निपचित पडून दिसताच निकेशच्या वडिलांना जबर धक्का बसला. मुलाने विषारी औषध प्राशन केल्याची बाब वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर सदर घटनेची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले.निकेशला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अवघ्या एकोणवीस वयात जीवन यात्रा संपविणाऱ्या निकेशच्या मागे आई-वडील भाऊ-बहीण असा बराच मोठा आप्तपरिवार असून युवकाच्या अशा अवेळी जग सोडून गेल्याने परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे.
घटनेचा तपास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात सहा. फौजदार किसन सुंकुरवार, विनेश राठोड करित आहे.





