– मृतदेह अद्याप गवसला नाही : खोल विहिरीत मृतदेह शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न
– तालुक्यातील करणवाडी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथील एका ४० वर्षीय विवाहित युवकाने गावातीलच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान उघडकीस आली.दरम्यान खोल विहिरीत मृतदेह शोधुन पाण्याबाहेर बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र अजून पर्यंत मृतदेह हाती लागला नाही.
लक्ष्मण रामचंद्र शिदुरकर (४०) रा.करणवाडी असे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे.
लक्ष्मण हे वणी येथील एका बँकेत काम करत होते. गत काही दिवसा आधीच त्यांनी मारेगावातील रुक्मिनी ले-आऊट येथे स्वतःचे घरही बांधले होते.
दरम्यान १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान लक्ष्मण यांनी करणवाडी येथील गावातीलच विहिरीत उडी घेऊन स्वतःची जीवन यात्रा संपवली.६० फुट खोल विहिरीत तब्बल ५५ फूट पाणी असल्याने लक्ष्मण यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्याबाहेर काढण्यात अनेक अडचणी येत आहे.वृत्त लिहीपर्यंत पर्यंत लक्ष्मण यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होती.
खोल विहिरीमधील पाण्यात लक्ष्मण यांचा मृतदेह शोधत असताना दोनदा गळाला लागला.परंतु गळाला लागूनही मृतदेह निसटून खोल पाण्यात पुन्हा दिसेनासा झाला. दरम्यान लक्ष्मण यांनी लिहिलेली सुसाईड नोट त्यांचे घरी सापडली असून या सुसाईड नोट मधूनच आत्महत्येचा खुलासा होणार आहे.




