– मारेगाव तालुक्यातील शिवनाळा येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील शिवनाळा येथील एका ५० वर्षीय शेतमजुराने विषाचा घोट घेत स्वतःची जीवन यात्रा संपविण्याची दुःखद घटना ६ सप्टेंबर रोजी पहाटे घडली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
केशव हनगु रामपुरे (५०) रा. शिवनाळा असे विषाचा घोट घेत आत्महत्या केलेल्या शेत मजुराचे नाव आहे.ते शिवनाळा येथे अतिक्रमित जागेवर शेती वाहत होते.त्यांच्या स्वतःच्या नावे शेती नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान केशव यांनी २७ ऑगस्ट रोजी स्वतःचे राहते घरी विषारी औषध प्राशन केले होते.सदरची बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्याने केशव यांना तात्काळ यवतमाळ येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते.तिथे त्यांचेवर नियमित उपचार होते.दरम्यान ६ सप्टेंबर रोजी पहाटे त्यांची प्रकृती अचानक खालावली.यातच यवतमाळ येथील रुग्णालयात केशव यांची प्राणज्योत मालवली.
तुर्तास केशव यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्यांचे पश्चात पत्नी लैजाबाई,मुलगा दत्ता व मुकींदा रामपुरे असा आप्तपरिवार असल्याची माहिती आहे.





