लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पहापळ येथील एका ४४ वर्षीय इसमाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार ता.२ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान उघडकीस आली.
अर्जुन भाऊराव काळे (४४) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून मृतक पहापळ येथे वास्तव्यास होते. मृतकाकडे सामाईक क्षेत्रात ०.४० आर शेती असून त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत.
यातील एका मुलीचे लग्न झाले असून दूसरी मुलगी शिकत असल्याची माहीती आहे.
दरम्यान शनिवार ता. २ नोव्हेंबर ला मृतक अर्जुन हे पांडव देवी येथे गोवर्धन पुजेच्या एक दिवसीय यात्रेत जावून दर्शन घेऊन आल्याची माहीती असुन घरी येवुन नंतर दुपारी ४ वाजेदरम्यान शेतात गेले व शेतातील निबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.
वृत्तलिहीस्तोवर मृतक अर्जुन यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नव्हते. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.




