— सुदैवाने जीवितहानी नाही
— अवकाळीचा उन्हाळी पीकांना फटका
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
सध्या अवकाळी पाऊस व वादळाने थैमान घातले असुन ता १२ मे रोजी दुपारी २ वाजेदरम्यान अकस्मात वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, वादळाला सुरवात होऊन तालुक्यातील चोपण येथे भर वस्तीतील सुबाभळीच्या झाडावर वीज पडली, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. अवकाळी पावसाने मात्र तालुक्यातील उन्हाळी पीकांना फटका बसला असुन शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर भर वस्तीत वीज पडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यासह जिल्हा तथा सगळीकडे अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. दरम्यान ता. १२ मे रोजी दुपारी २ वाजेदरम्यान प्रथम पावसाला सुरुवात झाली. मात्र थोड्याच वेळात मेघ गर्जनेसह विजांचा कडकडाट, व वादळी वाऱ्याचा जोर वाढत अक्षरशः थैमान घातले. त्यामुळे शेतातील मजूरांनी जीव मुठीत घेऊन घराचा रस्ता धरला.

याच वेळी विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि चोपण येथील बंडु खीरटकर यांच्या खाली जागेवर असलेल्या सुबाभळीच्या झाडावर वीज कडकडाटासह कोसळली. ज्या ठीकाणी विज कोसळली त्या जागेलगत असलेल्या घरातील व्यक्तींना काही वेळ धक्का बसला. विज कोसळल्यामुळे काही घरातील विद्युत उपकरणे निकामी झाल्याचे सुतोवाच आहे. वीज कोसळली तेव्हा त्या ठिकाणी लख्ख प्रकाश पडला असल्याचे सांगीतले जात असुन, सुदैवाने पाऊस सुरु असल्याने बाहेर कुणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली.

तालुक्यात अनेक शेतकरी उन्हाळी पीकाची लागवड करीत असुन सध्या मुग, भुईमूग, उडीद यासारख्या उन्हाळी पीकांचे नुकसान झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या कोसारा, सावंगी येथे सुध्दा पावसाने उन्हाळी पीकाचे नुकसान झाल्याची माहीती असुन, कोसारा शिवारातील पंढरपुरे यांचे शेतातील सौर उर्जा प्लेट्स वादळामुळे खाली वाकल्याची माहीती आहे.
आमच्या काळात वीज गावात पडल्याचे मी कधिच पाहीले नाही. मानसांच्या चुकामुळे ह्या घटना होत असुन जंगलातील झाडे दिवसेंदिवस कमी होत आहे. झाड तोडल्या जाते मात्र झाडे लावण्याची गरज कुणालाच वाटत नाही. आणि अशामुळे पर्यावरणीय तोल सांभाळणे यापुढेही कठीण होणार. दोष आम्ही निसर्गाला देतो,मात्र आम्ही सुध्दा चुकत आहो याकडे कुणाचेही लक्ष नाही किंवा लक्षच द्यायचे नाही. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला पाहीजे, जेणेकरून अशा घटना घडणार नाही.
श्रीमती तानेबाई गणपत राऊत (वय ७८ वर्ष)
चोपण, ता. मारेगांव.
