– ग्रामस्थांची पो.स्टे वर धडक : पोलिसात तक्रार अर्ज
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील वागदरा गावाचा ‘वागदरा’ असा उल्लेख करावयाचा असताना ‘आदिवासी पोड’ असा उल्लेख केल्याने संतप्त वागदरा ग्रामस्थांनी ४ सप्टेंबर रोजी मारेगाव पोलीस स्टेशन वर धडक दिली.यावेळी गैर अर्जदारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
मारेगाव तालुक्यातील वागदरा व वसंत नगर गट ग्रामपंचायत आहे. वागदरा येथे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतात.परंतु गावाचे मूळ नाव ‘वागदरा’ असताना (गाव नं.४३१) यास ‘आदिवासी पोड’ म्हणणे ही बाब निंदनीय आहे. यामुळे आम्हा समस्त आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या असुन आदिवासी समाजाचा प्रचंड अपमान झाला आहे.
परिणामी वागदरा गावाचा ‘आदिवासी पोड’ असा उल्लेख करणाऱ्या गैर अर्जदार गणपत काशीराम जाधव रा. वसंतनगर यांचे वर योग्य ती कारवाई करून आम्हास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तक्रार अर्जातून करण्यात आली आहे.
यावेळी शेकडो वागदरा वासी तसेच महिला उपस्थित होत्या.





