– संघटना आक्रमक : ठाणेदारांना निवेदन
– दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे विरुद्ध खोटी तक्रार करून त्यांची बदनामी करण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे.परिणामी याविरुद्ध जनहित कल्याण संघटना आक्रमक झाली असून ज.क.सं.सं.अ.गौरीशंकर खुराणा यांचे विरुद्ध खोटी तक्रार दाखल करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेने मारेगाव ठाणेदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.याला बगल दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
तालुक्यात जनहित कल्याण संघटनेच्या कार्याचा आलेख चढताच आहे.शेतकऱ्यांना आर्थिक मदत, वेळप्रसंगी कुणाच्याही मदतीस धावून जाणे,रुग्णवाहिका,शववाहिनी सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू करत गोरगरिबांचा आशिर्वाद हीच कमाई समजुन करत असलेले कार्य अनेकांना पचनी पडत नसल्याने शेकडोंच्या पोटात दुखायला लागले आहे.
नुकतीच जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांचे विरुद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांची बदनामी करण्याचा किळसवाणा प्रकार सुरू आहे.परीणामी या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन जनहित कल्याण संघटनेने मारेगाव ठाणेदारांना देत याला बगल दिल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही आपल्या निवेदनातुन दिला आहे.

यावेळी जनहित कल्याण संघटनेचे समीर कुडमेथे, रॉयल सय्यद, निलेश तेलंग, आकाश भेले, नगरसेवक अनिल गेडाम, नगरसेवक आकाश बदकी,रामजी सिडाना, शरीफ भाई,दिनकर डुकरे, रविंद्र पोटे, गौरव आसेकर,पुजा तेलंग,रसिका गेडाम,कविता मडावी, सुवर्णा खामनकर,प्रिया पाटील, अश्विनी खाडे,विजया कांबळे, मंगला आसेकर ,नुतन तेलंग,आदी शेकडो जनहितचे कार्यकर्ते उपस्थित होते.




