– १५ गावे बाधित
– ६० कच्च्या घरांची पडझड
– २५०० हे.आर. शेती पिकांचे नुकसान
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गत काही दिवसापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे.परिणामी तालुक्यातील मार्डी, कुंभा,वनोजादेवी परिसर पुरता जलमय झाला आहे.नाले तुडुंब भरून वाहत आहेत.२८ जुलै रोजी तालुक्यात नाल्याच्या पुरामुळे १५ गावे बाधीत झाली असून ६० कच्च्या घरांची पडझड होत तब्बल २५०० हे आर. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुक्याला अतिवृष्टीचा प्रचंड फटका बसल्याने नुकसानग्रस्तांचे ओले चिंब डोळे शासन मदतीच्या प्रतीक्षेत लागले आहे.
यावर्षी जून महिन्यात पावसाने दगा दिला असला तरी जुलै महिन्यातला विक्रमी पाऊस तालुक्यात कोसळतोय.गत काही दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार थांबत नसल्याने तालुक्यातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत.परिणामी नाल्याच्या पुरांमुळे अनेक गावी प्रभावीत झाली असून नाल्या शेजारी असलेली शेते पूरती खरडून गेली आहे.मागील वर्षीची परिस्थिती येण्याचा कयास बांधला जात आहे.
दरम्यान दरम्यान २८ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील १५ गावे बाधीत झाली असून ६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे.तर अतीवृष्टीमुळे शेत-शिवार जलमय झाले असून तालुक्यात २५०० हे.आर. वरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सद्यस्थितीत तालुक्यात कुठेही जीवित हानी झाल्याची माहिती नसली तरी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान न भरून निघणारे आहे. प्रशासन स्तरावरून बाधित गावातील नुकसानीचे पंचनामे करून शासन दरबारी मांडण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे.परिणामी नुकसानग्रस्तांचे ओले चिंब डोळे शासन मदतीच्या प्रतीक्षेत टक लावून आहे.
२८ जुलै रोजी सकाळी ८ वा.घेतलेल्या पावसाची नोंद पुढील प्रमाणे
मारेगाव – २१.००
मार्डी – ६८.००
वनोजादेवी – ३२.००
बोटोनी – २०.००
कुंभा – ५९.००





