— एलईडी लाईट रिपेअर व अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी प्रवेश देणे सुरु
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
स्थानिक कला वाणिज्य महाविद्यालयात “आचार्य चाणक्य कौशल्य” योजनेअंतर्गत एलईडी लाईट रिपेअर व अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदाकरीता प्रवेश देणे सुरू झाले आहे.परिणामी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विभाग योजनेअंतर्गत बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रांमधील रोजगार उपलब्ध करून देणे तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगार क्षम बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान मारेगाव येथील कला वाणिज्य महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विभाग योजने करिता प्रवेश मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यात एलईडी लाईट रिपेअर व अकाउंट एक्झिक्युटिव्ह या पदाकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर प्रवेशाची पात्रता अनुक्रमे बारावी व पदवी अशी असून इच्छुक उमेदवारांनी स्वतःचे आधार कार्ड, टी.सी. मार्कशीट, जात प्रमाणपत्र, पासबुक झेरॉक्स व पासपोर्ट फोटो आदी कागदपत्रे महाविद्यालयात जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश घरडे तसेच आयोजक डॉ.संतोष गायकवाड यांनी केले आहे.
सदर प्रवेश प्रक्रिये संदर्भातील अन्य माहिती करिता श्री.नितेश उईके (८४०८०९९०१३) यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.




