– क्रीडा संकुलाच्या जागेचा प्रश्न निकाली
– क्रीडा प्रेमीत उत्साह
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
गेल्या चार दशकापासून तालुक्यात क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडलेला असताना अखेर क्रीडा संकुल उभारणीस वाट मोकळी झाली असून येथील टाकरखेडा शेत शिवारात पाच एकर जमीन मंजूर करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे हस्तांतरित करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.शहरात लवकरच सुसज्ज असे क्रीडा संकुल उभारण्यात येणार असल्याने क्रीडाप्रेमीत उत्साहाचे वातावरण आहे.
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे.तालुका निर्मितीपासून येथे क्रीडा संकुलाची मागणी रखडलेली होती. तालुक्यातील नागरिकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष क्रीडा संकुलाचा प्रश्न उचलून धरला होता.अखेर मागणीस यश आले असून टाकरखेडा शेत शिवारातील गट क्रं. ३४ मधील पाच एकर जमीन क्रीडा संकुलास मंजूर करण्यात आली आहे.
क्रीडा संकुला अभावी अनेकांचे क्रीडापटू होण्याचे स्वप्न भंग पावले असले तरी आता क्रीडा संकुलास वाट मोकळी झाल्याने यापुढे तालुक्यातून निश्चितच उत्कृष्ट क्रीडापटू तयार होतील अशी चिन्हे दिसत आहे.




