– मारेगाव तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बोरी गदाजी येथे एका शेतकऱ्याने विषाचा घोट घेत आपली जीवन यात्रा संपविण्याची दुःखद घटना ७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.परिणामी परिसरात पूरती शोककळा पसरली आहे.
महादेव भाऊराव बेंडे (४८) रा.बोरी (गदाजी) असे विषाचा घोट घेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांचे नावे बोरी (गदाजी) येथे चार एकर शेती असल्याची माहिती आहे
दिवसेंदिवस तालुक्यात शेतकरी आत्महत्येचा आलेख चढताच आहे. गत तीन वर्षापासून तालुक्यातील काही भागात पूरबुडाईणे होत असल्याने नुकसानीमुळे बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे.
दरम्यान ७ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजे दरम्यान तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील महादेव बेंडे यांनी स्वतःचे राहते घरी विषाचा घोट घेतला.यात महादेव हे जागीच गतप्राण झाले.यावर्षीही पुराचे पाणी शेतात शिरल्याने शेतीच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे मृत महादेव हे आर्थिक विवंचनेत असल्याने आत्महत्ये सारखे धक्कादायक पाऊल उचलले असल्याची माहिती आहे.
मृत महादेव यांचे पश्चात पत्नी, आई, मुलगा,मुलगी असा परिवार असल्याची माहिती आहे.




