– मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील बोटोनी येथे एका ३२ वर्षीय घटस्फोटीत महिलेने स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची दुःखद घटना १० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजे दरम्यान घडली.परिणामी परिसरात सर्वत्र व्यक्त होत आहे.
रोशनी वसंता वरखडे (३२) रा . बोटोनी असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या महीलेचे नाव आहे.
दरम्यान रोशनी यांचा विवाह म्हैसदोडका येथील एका युवकाशी झाला होता. काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाल्याने गेल्या ५-६ वर्षांपासून घटस्फोटीत महिला ही आपल्या माहेरी बोटोनी येथे आईवडिलांकडे वास्तव्यास होती.
गत काही दिवसापासून महीलेची आई व स्वतः महीला आजारी होती. ता.१० ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजेदरम्यान आई घरातील दुसऱ्या खोलीत असताना घटस्फोटीत महिलेने आपल्या खोलीत गळफास घेतला.
मृत रोशनी यांचे पश्चात एक ८ वर्षाची मुलगी असल्याची माहिती असून या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




