— रणरागीनी धडकल्या पोलीस स्टेशनला, दिले निवेदन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क/ मारेगांव….
सिंदी येथे अवैध दारु विक्रीला उत आला असून सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याने येथील अवैध दारु विक्री तत्काळ बंद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन सिंदी येथील रणरागीनींनी मारेगांव पोलीस स्टेशनला दिले आहे.
तालूक्याचा पसारा शंभरावर गावावर पसरला असुन आदिवासीबहुल तालूका आहे. सध्या तालुक्यात अनेक गाव पाड्यात अवैध दारु विक्रीला उत आला असल्याची माहीती आहे. या अवैध दारु विक्रीला निर्बंध घालणे आवश्यक असल्याचे मत गावपाड्यातील गोरगरीब जनतेकडून वर्तविले जात आहे.
यातून तालुक्यातील सिंधी हे गाव सुध्दा या अवैध दारु विक्रीला अपवाद नाही.सिंधी हे गावाला पूर्वीपासूनच आध्यात्मिक वारसा असल्याने या गावात अनेक धार्मिक कार्यक्रम राबविले जाते. या गावात भजन मंडळे आहेत. या गावाला सुध्दा अवैध दारु विक्री होत असल्याने सामाजिक स्वास्थ्याला हानी पोहचत आहे.
ता. ८ फेब्रुवारीला येथील महिलांनी अवैध दारू विक्रेत्याला रंगेहात पकडले. त्याला दारू विक्रीसाठी मज्जाव केला असता उलट त्याने महिलांशी हुज्जत घालत त्यांच्याशी वाद घातला. महिलांनी अवैध दारु दारू विकण्यास मज्जाव केला असता त्याने गावकरी माझे काहीच करू शकत नाही, अशा प्रकारे मुजोरीची भाषा वापरत असल्याचे महिलांनी सांगीतले.
या अवैध दारुच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलांनी ता. ९ फेब्रुवारीला पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार पोलीस उपनिरीक्षक विकी जाधव यांना दिली. यावेळी सरपंच नीलिमा चंद्रशेखर थेरे, संतोष भाऊराव निब्रड, पोलीस पाटील, पुरुषोत्तम नानाजी भोयर, दिनेश झित्रूजी गेडाम, सोनू श्यामसुंदर ढवस, प्रियंका संदीप देवाळकर, सविता विलास नेहारे,छाया संतोष निब्रड, कुसुम डाखरे, सुरेखा म्हसे, संगीता महारतळे, कोमल डाहुले, विजया गोहोकर, प्रियंका देवाळकर, शशिकला लेडांगे, इंदुबाई लेडांगे, सोनाबाई भगत, रेखा महारतळे, लता जांभुळकर, अंजनाताई पोतराजे, सुरेखा गायकवाड, पल्लवी परचाके, मंजुषा जांभुळकर, सुनीता परचाके यांच्यासहित अनेक महिला पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होत्या.




