– शेकडो आदिवासी समाज बांधवांचा सहभाग
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मारेगाव तालुक्यातील सिंदी येथे ता.१५ नोव्हेंबर रोजी शेकडो आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत धरतीमानव बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील ईलीहातू या गावी १८९५ रोजी झाला होता. इंग्रजांकडून अशिक्षित आदिवासी समाज बांधवांवर होणारा अन्याय त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला होता. परिणामी याविरुद्ध त्यांनी शस्त्र उभरले होते.
दरम्यान १५ नोव्हेंबर रोजी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती तालुक्यातील सिंदी येथे शेकडो आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सिंदी गावातून काढलेली रॅली लक्षवेधी ठरली.
यावेळी सिंदी येथील सरपंचा निलीमा थेरे,विश्वनाथ राऊत,सदस्य प्रदीप डाहुले, गणेश झाडे, गणपत ढवस, अनिल राऊत,अजय गेडाम,दिपक नागोसे, गणपत नागोसे, महीला रंजना राऊत, पल्लवी परचाके,लता नागोसे, पौर्णिमा राऊत यांचेसह सिंदी येथील असंख्य आदिवासी समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.





