♦धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ
•लोकशस्त्र न्यूज नेटवर्क : मारेगाव
गेल्या काही दिवसांपासून मारेगाव शहरासह तालुक्यात महिला अत्याचारांच्या घटनांत वाढ होत असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली असुन तालुक्यातील चिंचाळा परिसरातील दोन विधीसंघर्ष मुलांनी दोन सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने तालुक्यात पुरती खळबळ माजली असुन मुलींच्या आई-वडीलांना धक्का बसला आहे.
तालुक्यातील चिंचाळा परिसरात राहणाऱ्या दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांनी दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अल्पवयीन मुली खेळत असताना गावातीलच दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांनी त्यांना एका पडक्या घरात नेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला असल्याची घटना १९ मार्च रोजी उघडकीस आली.
दोन्ही मुलीच्या आईवडिलांनी २२ मार्च रोजी मारेगाव पो.स्टे.गाठत या घटनेची तक्रार दाखल केली असून सदर तक्रारीवरून लैंगिक अत्याचार पोक्सो नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास उपविभागीय पो.अधिकारी संजय पुज्जलवार,मारेगाव पो.स्टे.ठानेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सांवत करत आहे.
