लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
आगामी निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर आज ता.११ ऑगस्ट रोजी शिवसेना (शिंदे) मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे यांचे आदेशानुसार व पश्चिम विदर्भ संपर्क मंत्री संजय राठोड यांचे सुचने नुसार माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा झरी, वणी, मारेगाव तालुका शाखा संवाद सभेचे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दुपारी ३.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
सदर संवाद सभा माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे, लोकसभा समन्वय माजी आमदार विश्वास नांदेकर जिल्हासंपर्क प्रमुख श्रीधर मोहोड व हरीहर लिंगणवार, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, सह संपर्कप्रमुख विनोद मोहितकर, उपजिल्हा प्रमुख सुधकर गोरे, महिला आघाडी संघटिका वैशाली मासाळ, युवसेना लोकसभा अध्यक्ष विशाल गणात्रा, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जीवन काळे, या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार असुन मारेगाव तालुकाप्रमुख ,शहर प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी, युवसेना पदाधिकारी तालुका कार्यकारिणीचे सर्वच पदाधिकारी आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सर्व शिवसेना शाखा अध्यक्ष (प्रमुख) व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपास्थित राहावे असे आवाहन मारेगांव तालुका शिवसेनेचे (शिंदे) विशाल किन्हेकर यांनी केले आहे.




