– ॲट्राॅसिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल
– संशयित आरोपी पोलीसांच्या ताब्यात
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
तालुक्यातील एका गावातील युवतीला लग्नाचे त्याच गावातील युवकाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात पुरती खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पीडित युवतीने टपाल द्वारे बयान नोंदवून तक्रार दाखल केली आहे. संशयीतावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे
अमोल राजेंद्र नक्षीने (२७) असे लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे शोषण करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.
दरम्यान अमोल व पीडित युवती यांचे तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते.’साथ जिएंगे साथ मरेंगे’ अशा प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांनीही प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. दरम्यानच्या काळात लग्नाचे आमिष दाखवून संशयित आरोपीकडून युवतीचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले.
दरम्यानच्या काळात पीडिता गर्भवती राहिली.यावेळी पीडित युवतीने लग्नाचा हेका धरायला सुरुवात केली.परंतु संशयिताने मात्र घुमजाव करत लग्न करण्यास साफ नकार दिला.
पीडित युवतीने पोटात वाढत असलेल्या गर्भाविषयी अमोल यास सांगितले असता त्याने पीडीतेस गर्भपाताच्या गोळ्या आणून जबरदस्तीने खाऊ घातल्या.
संशयित युवकाने पीडितेवर गर्भपात करण्यास वारंवार दबाव आणला. लग्नाला कायम नकार येत राहिला. परिणामी पीडित युवतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा सुध्दा प्रयत्न केला. लग्नास कायम नकार देणाऱ्या धोकेबाज प्रियकरावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा आशयाची तक्रार पीडित युवतीने टपाल द्वारे बयान नोंदवून दाखल केली असून संशयितावर ॲट्राॅसिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन संशयितास ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहे.




