– स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आयोजन
– गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
भाजपच्या वतीने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ या सेवा पंधरवड्या अंतर्गत अवघ्या देशभरात ‘सेवा पंधरवडा’ हा स्तुत्य उपक्रम भारतीय जनता पक्षाचे वतीने आयोजन करण्यात आले आहे.परिणामी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगावातील ग्रामीण रुग्णालयात ता.२२ सप्टेंबर रोजी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गरजुंनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून ते महात्मा गांधी जयंती पर्यंत अवघ्या देशभरात सेवा पंधरवडा हा उपक्रम राबविला जातो.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या सेवा पंधरवड्यात लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले जातात.
दरम्यान भाजपद्वारा २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदानासह रक्तातील साखर तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिन, रक्तदाब तपासणी , सिकलसेल तपासणी,गरोदर माता तपासणी, टीबी, कुष्ठरोग, लिव्हर तपासणी , कॅन्सर,डेंगू, मलेरिया व इतरही आरोग्य तपासण्या केल्या जाणार आहे.

गरजूंनी या रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात चा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा द्वारे करण्यात आले आहे.




