– शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
पुजा मडावी (वासरीकर) : मारेगाव
केंद्र शासनाच्या आदेशाने ‘स्वच्छता पंधरवडा’ हा उपक्रम अवघ्या देशभरात साजरा होतो आहे.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘स्वच्छता पंधरवडा’ हा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शेकडो विद्यार्थ्यांनी यात हीरीरीने सहभाग घेतला.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पर्यंत साजरा होणारा स्वच्छता पंधरवडा हा ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाच्या स्वच्छता मोहीमेचा एक भाग आहे.परिणामी संपूर्ण देशभरात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे.

दरम्यान १ ऑक्टोबर रोजी स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वच्छता पंधरवडा हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रशिक्षण संस्थेतील शेकडो विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सभोवतालचा परिसर स्वच्छ केला.

यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षक विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





