– नरेंद्र कांडुरवार यांचे समर्थनार्थ निवेदन सादर
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
प्रफुल्ल ठाकरे : मारेगाव
तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ माजवणारी आरोप- प्रत्यारोपांची शृंखला गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.प.स.मारेगाव येथील बीईओ नरेंद्र कांडूरवार यांचे विरोधात कास्ट्राइब शिक्षक संघटनेने केलेल्या आरोपांचे वादात तालुका मुख्याध्यापक संघटनेने उडी घेतली असून बीईओंचे समर्थनार्थ निवेदन सादर केले आहे.
तालुक्यातील शासकीय कार्यालयांत कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची वानवा असताना पंचायत समिती मारेगाव येथे प्रभारी बीईओ म्हणून नरेंद्र कांडूरवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर तालुक्यातील ढेपाळलेल्या शिक्षण क्षेत्राने प्रचंड कात ओकली.
सतत कामाचा पाठपुरावा करणारा,कामात हलगर्जीपणा केल्यास ते लक्षात आणुन देणारा अधिकारी नकोसा झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात घाणेरड्या राजकारणाचा शिरकाव झाला.परिणामी बीईओंची उचल बांगडी करण्याचे काळवंडलेले प्रयत्न सुरू झाले.
परिणामी कार्यालयात सोडवता येणारा टेबल-खुर्ची वाद उचलून धरत प्रभारी बीओंचे निलंबन करण्याची मागणी कास्ट्राइब शिक्षक संघटनेने उचलून धरत ३ जुलै रोजी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन उभारले.

परिणामी बीईओ-कास्ट्राइब शिक्षक संघटनेचा वाद चिघळत असतानाच यात मारेगाव तालुका मुख्याध्यापक संघटनेने गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कांडूरवार यांचे समर्थनार्थ उडी घेतल्याने टेबल-खुर्ची वादात कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले.
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प.स.मारेगाव अनिल राऊत यांना ३ जुलै रोजी दिलेल्या निवेदनात तालुका मुख्याध्यापक संघटना बीईओंचे समर्थनार्थ ठाम उभी राहिली असून सर्वांप्रती सहकार्याची भावना ठेवणारे नरेंद्र कांडूरवार यांचे वरील आरोप बिनबुडाचे असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी सुधाकर काळे,सुनित पी.आष्टेकार,संजय व्ही. देवाळकर,भुदेव पौडे,भारत गारघाटे,राजेश पोटे,सुभाष चिकटे,योगेश वेल्ले,सुषमा निद्रा,हेमंत चौधरी,दिलीप पाटील,एम.एम.महाडके दिलीप बि.एम.निखाडे,प्रविण किशोर जोगी,हेमंत अनिल ताजणे,संदिप विठ्ठलनाव देरकर,राकेश ठाकरे आदी मुख्याध्यापकांचा जथ्था उपस्थित होता.
सेवापुर्ती संपण्याकरिता अवघा महिना शिल्लक असताना कामास प्रथम प्राधान्य देणारे,मनमिळाऊ गटशिक्षण अधिकारी नरेंद्र कांडूरवार हे घाणेरड्या राजकारणाचा बळी ठरतील की अवघ्या तालुक्यातील शाळांतील चिमुकल्यात आवडते असलेले ‘सच्चे शिक्षक’ सन्मानपूर्वक आपला सेवापूर्ती कार्यकाळ संपवून निरोप घेतील याकडे समस्त तालुका वासियांचे लक्ष लागले आहे.




