– जि.प. उच्च प्राथमिक शाळा खैरी च्या शिरपेचात मानाचा तुरा
– तब्बल ३३ वर्षानंतर मिळाले दैदीप्यमान यश
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव…..
मोरेश्वर ठाकरे : मारेगाव
२० जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षेचा निकाल ३० मार्च २०२४ रोजी लागला असुन त्यात राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी कु.संबोधी अनिल थुल हीने विशेष गुणवत्ता प्राप्त करत राळेगांव तालुक्यात प्रथम आल्याने संबोधीची जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथे निवड करण्यात आली. संबोधीची निवड झाल्याने तब्बल ३३ वर्षानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरी च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
प्राथमिक शाळा ही एक अशी व्यवस्था आहे जिथे विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तोंडओळख होते. तसेच मुलांना घरापासून स्वतंत्र रहायला शिकतात. हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे व आवडीचे शिक्षण असते. काही देशात या स्तराला एलिमेंटरी स्कूल असे म्हणण्याची पद्धत आहे.विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा हा महत्वाचा दुवा ठरतो. पुर्वी याच जिल्हा परिषद शाळेतुन शिकुन गेलेले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर आजही आहेत.
दरम्यान १९ व्या शतकात काॅन्वेंट शाळा प्रणाली ब्रिटीश सरकारने सुरू केली होती. स्वातंत्र्यानंतर सरकारने या शाळांचा ताबा घेतला, परंतु नंतर त्या चर्चच्या अधिकाऱ्यांकडे परत देण्यात आल्या जे आजही त्या चालवतात. १९८५ -९० मध्ये काॅन्वेट शहरातच पहायला मिळत होते. मात्र नंतर जवळपास २०१५ पासुन ग्रामिण भागात सुध्दा काॅन्वेंट पहायला मिळत आहे. एकुणच पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा सुरु झाला. पालकांची मानसिकता बदलली व पाल्यांना काॅन्वेंट मध्ये शिकविण्याची इच्छा प्रबळ झाल्याने ज्या शाळांमधून विद्यार्थी शिक्षण घेत मोठे झाले त्याच जिल्हा परिषद शाळांकडे पालकांकडून पाठ फिरविल्याचे विदारक वास्तव असले तरी ज्यांची जिल्हा परिषद शाळेला नाळ जुळली ते सर्वसामान्य पालक मात्र पाल्यांना मराठी शाळेतुनच शिकवित आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या खालावली.
मात्र आजही जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचा वसा उचलत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक जोमाने करत असल्याचा नुकताच प्रत्यय आला.
दरम्यान २० जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश निवड परीक्षेचा निकाल ३० मार्च २०२४ रोजी लागला असुन त्यात राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी कु.संबोधी अनिल थुल हीने विशेष गुणवत्ता प्राप्त करत राळेगांव तालुक्यात प्रथम आल्याने संबोधीची जवाहर नवोदय विद्यालय बेलोरा येथे निवड करण्यात आली. संबोधीची निवड झाल्याने तब्बल ३३ वर्षानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरी च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असुन या यामुळे संबोधीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
राळेगाव तालुक्यातून एकमेव नवोदय विद्यालय साठी निवड झालेल्या विद्यार्थिनीचे गटशिक्षणाधिकारी शेळके तसेच केंद्रप्रमुख सुरेश कुंभारकर यांनी “संबोधीचे” कौतुक करून अभिनंदन केले. शाळा व्यवस्थापन समितीने व शिक्षकांनी यापुढेही शिक्षण क्षेत्रात शाळेतील गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे ” लोकशस्त्रशी” सोबत बोलतांना सांगितले.
खैरी गावाच्या इतिहासात तब्बल ३३ वर्षानंतर अर्थात १९९२ मध्ये जिल्हा परिषद शाळेचा हरिदास बापूराव पवार नामक विद्यार्थ्याची निवड झाली होती. ते आज नवोदय मध्ये शिकून कृषी अधिकारी या पदावर कार्यरत आहे. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी आज संबोधि थूल या विद्यार्थिनीची निवड झाली आहे.

यश संपादित करण्यास मार्गदर्शक शिक्षक महेंद्र कौरती वर्ग शिक्षिका (स्वयंसेविका) योगिता धोटे तसेच विशेष मार्गदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री सुरेश कुंभलकर यांनी विशेष मेहनत घेतली असुन शिक्षक प्रवीण दीडपाये, राजकुमार शिंदे यांचे शैक्षणिक नियोजन व मार्गदर्शन हेही माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले.
संबोधी थूल, विद्यार्थीनी.
माझ्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळात आज पर्यंत महादिप व नवोदय या परीक्षेत माझ्या जिल्हा परिषद केंद्र शाळेने प्राविण्य प्राप्त केले असून यापुढेही ते शिक्षणात पुढे राहील यासाठी माझे प्रयत्न असून जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारावा यासाठीच माझे प्रयत्न राहणार आहे कारण माझ्या गावातून पालक वर्गातून माझ्यावर विश्वास टाकून मला चौथ्यांदा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी पालकांनी विराजमान केले आहे. त्यामुळे त्यांचा विश्वास मी सार्थ ठरविणार आहो. मला माझ्या शाळेचा अभिमान आहे.
खुशाल वानखडे
अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,
जिल्हा परिषद केंद्र शाळा खैरी.





