— दोन नाती एकाच वेळी प्रेमाविना पोरकी
— वणी-वरोरा मार्गावरील घटना
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वणी-वरोरा महामार्गावरील वणी येथील संविधान चौक नजीक एका भरधाव मालवाहू ट्रकच्या धडकेत मारेगाव येथील एक २९ वर्षीय युवक जागीच ठार झाल्याची घटना ता. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेदरम्यान घडली आहे. गणेशचा अपघातात मृत्यू झाल्याने मात्र एकाचवेळी दोन नाती प्रेमावीन पोरकी झाली.
अपघातात जागीच ठार झालेल्या २९ वर्षीय युवकाचे नाव गणेश हरिश्चंद्र बदकी (२९) असुन वार्ड क्र. २ मारेगाव येथे त्याच्या आईवडीलासोबत वास्तव्यास होता.
हरिश्चंद्र बदकी यांना एक मुलगा व एक मुलगी. ही दोनच भावंड. मृतक गणेश हा अविवाहित असून त्याच्या लाडक्या धाकट्या बहीनिचे लग्न झाले.तीच्या संसारवेलीवर एक पुष्प दोन दिवसापूर्वीच उमलले. पुत्ररत्न प्राप्तीचा निरोप भावाला दिला. भाचा झाल्याची गोड बातमी मामा गणेश यांना कळली.भाचा व बहिनीला पाहण्यासाठी चंद्रपूर येथे गेले.बहीण व भाच्याची भेट घेतली व गणेश हे मारेगांवकडे ता. ५ फेब्रुवारी रोजी परतीच्या प्रवासाला निघाले.
मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. मृतक गणेश चंद्रपूर वरुन सरळ वरोरा मार्गे मारेगांवला दुचाकीने येताना, सकाळी १० वाजेदरम्यान संविधान चौकाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने गणेश यांच्या दुचाकिला जबर धडक दिली. या भीषण धडकेत गणेश यांचा जागीच मृत्यू झाला.
या जगात पाऊल ठेवलेला दोन दिवसीय गोंडस बाळ मामाच्या प्रेमाला, व एकुलती एक लाडकी बहीण मात्र या घटनेने भावाच्या प्रेमाला पोरके झाले आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.




