लोकशस्त्र न्युज नेटवर्क/मारेगाव
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर तालुक्यात सुरक्षेच्या दृष्टीने मारेगाव पोलिस तथा सी आय एस एफ प्लॅटून कडून मारेगाव शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गावरून ता.९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेदरम्यान पथसंचलन करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुक २०२४ तालुक्यात निर्विघ्नपणे पार पडाव्या व जनतेनी निर्भीड होऊन मतदान करावे, जनतेने कोणतीही भीती न बाळगता मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी मारेगाव पोलीस , सी आय एस एफ प्लॅटून चे जवानांनी मारेगाव शहर मुख्य मार्गावरून व मिश्रवस्तीतील अंतर्गत मार्गावरून ता. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० दरम्यान पथसंचलन केले. सदर पथसंचलना करिता सी आय एस एफ प्लटून तसेच पोलीस स्टेशन मारेगाव येथील १ पोलीस अधिकारी व ८ पोलीस अमलदार होते.




