– वरोरा येथे अपघात
– व्हाट्सअपच्या माध्यमातून कुटुंबीयांना माहिती
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रत्नमाला पुलाचे खाली रेल्वे ट्रॅक वरती रेल्वे खाली येत मारेगाव येथील सलून व्यावसायिक ठार झाल्याची हृदय द्रावक घटना ५ जून रोजी दुपारी घडली.ता.८ जुन रोजी सकाळी व्हाट्सअपच्या माध्यमातून सदर घटनेची माहिती त्यांचे कुटुंबीयांना मिळाली.
विठ्ठल शेटे (६०) रा.मारेगाव असे रेल्वे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांचे मारेगाव येथे सलून प्रतिष्ठान आहे.ते सलून व्यावसायिक होते.
दरम्यान मंगळवार ता.५ जुन रोजी ते काही कामानिमित्त वरोरा येथे नातेवाईकांकडे जातो असे सांगून घरुन गेले असता घरी परत आलेच नाही.घरच्यांनी नातेवाईकांकडे विचारपूस केली असता त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही.
विठ्ठल यांचे शोधार्थ त्यांचे कुटुंबीय चौफेर पालथे घालत असता अखेर ता.८ जुन रोजी सकाळी व्हाट्सअपच्या माध्यमातून वरोरा येथील रत्नमाला पुलाचे खाली (रेल्वे पोल क्रं,८३१/१५-१७) येथे रेल्वे ट्रॅक वरती त्यांचा अपघात झाल्याची माहिती त्यांचे कुटुंबीयांना मिळाली असता त्यांचे कुटुंबीय वरोरा येथे रवाना झाले.सदर घटनेने शेटे कुटुंबीयांवर पूरता दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वृत्त लिहीपर्यंत त्यांचा मृतदेह वरोरा येथुन मारेगाव येथे त्यांचे राहते घरी आणण्याची प्रक्रिया सुरू होती.
विठ्ठल यांचे पश्चात पत्नी,मुलगा, सून व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
