-शिवसैनिकांच्या उपस्थितीत मार्डी चौकात निदर्शने
लोकशस्त्र न्युज नेटवर्क : मारेगाव
मणिपूर येथील कलंकित घटनेने अवघा देश संतापून उठला असतानाच ता.२५ जुलै रोजी येथील मार्डी चौकात शिवसेना (उ.बा.ठा.) तालुका प्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत या कलंकित घटनेचा जाहीर निषेध केला.यावेळी या घटनेतील आरोपींना फासावर चढवा अशी निदर्शने देण्यात आली.याबाबतचे निवेदनही येथील तहसीलदारांना देण्यात आले.
मणिपूर येथील कलंकित घटनेचे पडसाद देशभर उमटत आहे.दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशभरातील जनता पेटून उठली आहे.
दरम्यान २५ जुलै रोजी शहरातील मार्डी चौकात शिवसेना (उ.बा.ठा.) तालुकाप्रमुख संजय आवारी यांचे नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत या अमानवीय घटनेचा जाहीर निषेध केला. यावेळी या घटनेतील क्रूर नराधमांना फासावर चढवा अशी निदर्शने देण्यात आली.याबाबतचे निवेदनही येथील तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख (उ.बा.ठा.) संजय आवारी यांचेसह नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जीवन काळे, नगरसेवक जितेंद्र नगराळे, नगरसेविका वर्षा कींगरे, नगरसेविका माला बदकी, सुनील गेडाम,युवा सेना तालुका प्रमुख मयूर ठाकरे,कृ.उ.बा.स.संचालक ब्रह्मदेव जुनगरी, मनोज वादाफळे, विजय अवताडे,टुमदेव बेलेकर,सुरेश पारखी,राजु मोरे,संजय जिवने आदी उपस्थित होते.




